Join us  

अतिरेक नको; पण कठोर कारवाई करा - कुंटे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:23 AM

कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.

कुंटे यांनी शुक्रवारी  दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे व नाशिक  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याशी संवाद साधला. पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आढावा घेतला. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासीतांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून प्रत्येक त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरिता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश कुंटे यांनी दिले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस