Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनायच होत डॉन... त्याआधीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:10 IST

मुंबई : डॉन बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कन्नन चिन्ना दुराई स्वामी ऊर्फ बडा ...

मुंबई : डॉन बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कन्नन चिन्ना दुराई स्वामी ऊर्फ बडा कन्ना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे डॉन बनण्याचे स्वप्न होते, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

मुंबईतल्या एका राजकीय नेत्यासाठी तो शार्प शूटर म्हणून काम करीत होता. तो आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १९ मध्ये राहण्यास आहे. त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी उकळणे अशा गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्याला सहार, एमआयड़ीसी, साकीनाका, पवई पोलिसांनी तड़ीपार केला आहे. तो अंधेरी एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

९ ऑक्टोबर रोजी कन्नाने एकावर प्राणघातक हल्ला चढ़विला. याप्रकरणी दाखल हत्येचा प्रयत्नाच्या गुह्यांत आरे पोलीस त्याचा शोध घेत होते. याच गुह्यांत त्याला अटक करण्यात आली आहे.