Join us

देशांतर्गत विमान प्रवास आणखी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंधन दरवाढ आणि सुरक्षा शुल्काच्या भारामुळे आधीच महागलेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंधन दरवाढ आणि सुरक्षा शुल्काच्या भारामुळे आधीच महागलेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी विमान तिकीट दरांच्या किमान आणि कमाल मर्यादेत ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई-दिल्ली प्रवासासाठी आता किमान ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू करताना सरकारने विमान तिकिटांचे कमाल आणि किमान दर निश्चित केले होते. त्यानुसार निश्चित रकमेपेक्षा कमी किंवा जादा भाडे विमान कंपन्यांना आकारता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले होते. मे २०२० पासून आतापर्यंत चार वेळा दरांत वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाशांना या वाढीव दरांवर जीएसटी, प्रवासी सुरक्षा शुल्क, विकास शुल्क आणि इतर कर अशी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी जवळपास ५ हजार रुपये मोजावे लागतील, अशी माहिती एका खासगी कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

.........

नवे दरपत्रक असे (सर्व कर वगळून)

प्रवास (मिनिटे)कमाल भाडे किमान भाडे

४० मिनिटे२,९००८,८००

४० ते ६० ३,७००११,०००

६० ते ९० ४,५००१३,२००

९० ते १२० ५,३००१४,६००