Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड

By admin | Updated: September 12, 2014 01:24 IST

शहरातील रस्ते रिक्षाचालकांसाठी आंदण दिले असून मुख्य रस्ते, चौकांबरोबरच गल्ली तेथे अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड बिनदिक्कत उभे राहिले

डोंबिवली : शहरातील रस्ते रिक्षाचालकांसाठी आंदण दिले असून मुख्य रस्ते, चौकांबरोबरच गल्ली तेथे अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड बिनदिक्कत उभे राहिले असताना येथील इंदिरा गांधी चौकातील महत्त्वाच्या कै लासभाई मेहता मार्गावर आणखी एका अनधिकृत स्टॅण्डची भर पडली आहे. याकडे कल्याण आरटीओच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना वाहतूक पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रवाशांशी उद्धट वर्तन, भाडे नाकारणे ही मुजोरी नित्याचीच बाब असताना उभे राहिलेले अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड डोंबिवलीकरांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही ठोस अशी कारवाई आजवर झालेली नाही. मध्यंतरी उपमहापौर राहुल दामले यांनी अशा स्टॅण्डवर कारवाई करण्यासंदर्भात वाहतूक शाखेला पत्र पाठवले होते. यावर कारवाई होणे अपेक्षित होते़ परंतु, तत्कालीन वाहतूक निरीक्षक बी. यादव यांनी जागेअभावी कारवाई अशक्य आहे, असे उत्तर त्यांना पाठवले होते. (प्रतिनिधी)