Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीजवळ लोकल रुळावरून घसरली, म.रे विस्कळीत

By admin | Updated: September 30, 2014 15:00 IST

टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थावकाजवळ घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ३० - टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थावकाजवळ घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी ११.३०च्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी स्लो ट्रॅकवरील लोकलचे काही डबे घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे स्लो ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली असून ती फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे.दरम्यान रेल्वे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून थोड्याच वेळात वाहतूक पूर्वपदावर येईल असे समजते.