मुंबई : टीव्ही रिअॅलिटी शोमधील कलाकार डॉली बिंद्रा हिला दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़
बिंद्रा हिचा सोसायटीमधील रहिवाशांसोबत गेल्या महिन्यात वाद झाला़ याप्रकरणी पोलिसांनी बिंद्रा व तिची आई जसवंत कौर बिंद्राविरोधात बेकायदा जमाव व दंगलीचा गुन्हा नोंदवला़ यात होणारी अटक टाळण्यासाठी बिंद्रा व तिच्या आईने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला़ स्वत:च्या घराबाहेर जमाव केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही़ त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बिंद्रा व तिच्या आईने न्यायालयात केली़ ती मंजूर करीत न्यायालयाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला़