Join us  

रजेवर गेलेल्या डॉक्टरांना रजेवरून बोलावले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 3:10 AM

केवळ आपत्कालीन शस्त्रक्रियाच पूर्ण केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

मुंबई : निवासी डॉक्टरांचा बेमुदत राज्यव्यापी संप बुधवारी सकाळपासून सुरू झाल्याने अनेक रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली. त्यामुळे बऱ्याच रुग्णालयांत रजेवर गेलेल्या डॉक्टरांच्या रजा रद्द करून सेवेत हजर राहण्यास सांगितले. केवळ आपत्कालीन शस्त्रक्रियाच पूर्ण केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.बºयाच रुग्णालयांत साथीच्या आजारांमुळे बाह्य रुग्ण कक्षात रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारीही यात भर पडली. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी असणारे युनिट्स एकत्र करून त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. तर जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागाच्या बाहेर हातात फलक घेऊन निदर्शने केली.सेंट जॉर्ज रुग्णालयातही काही शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या तर काही रद्द झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. तर वाढत्या साथीच्या आजारांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली. निवासी डॉक्टरांचा संप असला तरी अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्याची माहिती त्यांनी दिली.संपाचा फारसा परिणाम नाहीकेईएम रुग्णालय : बाह्य रुग्ण विभागात सुमारे ५ ते ६ हजार रुग्णांवर उपचार, ४१ हून अधिक प्रमुख शस्त्रक्रिया, २२ प्रसूती आणि ९४ हून जास्त आंतर रुग्ण दाखल.नायर रुग्णालय : बाह्य रुग्ण विभागात २५०० रुग्णांवर उपचार, १५ प्रमुख शस्त्रक्रिया, सुमारे १६ छोट्या शस्त्रक्रिया, १० डिलिव्हरी, ९० आंतररुग्ण दाखल, सुमारे ६ हजार रुग्णांच्या विविध चाचण्या. या रुग्णालयातील ३२८ निवासी डॉक्टर्स संपात सहभागी आणि २६२ निवासी कामावर हजर.सायन रुग्णालय : बाह्य रुग्ण विभागात ४ हजार रुग्णांवर उपचार, १०० रुग्ण दाखल, आपत्कालीन विभाग २०० रुग्ण, १५ ते २० मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया आणि १० प्रसूती.जे.जे. रुग्णालय : बाह्य रुग्ण विभागात ३ हजार ३७४ रुग्णांवर उपचार, नवीन दाखल झालेले रुग्ण ८२, मोठ्या व छोट्या २० शस्त्रक्रिया.मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या रुग्णालयांमधील दैनंदिन सेवांवर निवासी डॉक्टरांच्या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. संप काळात वरिष्ठ डॉक्टर आणि इंटर्न्स वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. जे रुग्ण दैनंदिन विविध वैद्यकीय सुविधांसाठी आले होते,त्या सर्वांना सेवा देण्यात आली.- डॉ. रमेश भारमल, नायर अधिष्ठाता, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक

टॅग्स :डॉक्टरसंप