Join us
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल ग्रामीण रु ग्णालयात डॉंक्टर वाढले

By admin | Updated: February 2, 2015 02:47 IST

पनवेल ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती.

पनवेल : पनवेल ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडून या ठिकाणी नव्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसराचे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांविषयी ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी बातमी देखील प्रकाशित केली होती. यापूर्वी या ठिकाणी १४ साहाय्यक कर्मचारी आणि एक वैद्यकीय अधिकारी अशी १५ जणांची संख्या होती. त्यात आणखी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाढ करण्यात आल्यामुळे आता या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे . (प्रतिनिधी )