Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना मारहाण

By admin | Updated: May 28, 2017 00:54 IST

रुग्ण दगावल्याच्या रागातून ठाण्यातील एका खासगी रुग्णालयावर कापूरबावडीतील बाबा वाघमारे यांच्यासह ११ जणांच्या गटाने हल्ला करत तोडफोड करून डॉक्टरांनाही मारहाण

- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रुग्ण दगावल्याच्या रागातून ठाण्यातील एका खासगी रुग्णालयावर कापूरबावडीतील बाबा वाघमारे यांच्यासह ११ जणांच्या गटाने हल्ला करत तोडफोड करून डॉक्टरांनाही मारहाण केली. त्यानंतर, पोलिसांनाही त्यांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.बाबा वाघमारे (३०), सागर गरगडे (२३) आणि साईराम गरगडे (२४) अशी या प्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. वासू बेलगिरे (४८) यांना त्यांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी २५ मे रोजी रात्री ११.३० वा.च्या सुमारास मानपाडा येथील टायटन या रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉ. मुशरफ खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तपासल्यानंतर ते मृत पावल्याचे नातेवाइकांना त्यांनी सांगितले. याचाच राग आल्याने बाबा वाघमारे, सागर, साईराम, रवी अहिरे, सागर चव्हाण, शंकर कुडेर आदी १० ते ११ जणांनी रुगणालयाच्या दरवाजाचे नुकसान केले. तेथील डॉ. मुशरफ खान यांनाही मारहाण केली. रुग्णालयात शिरण्याचाही त्यांनी प्रयत्न करून डॉक्टरांना शिवीगाळ आणि दमदाटी केली.