Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात ११ डिसेंबरला डॉक्टरांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:15 IST

मुंबई : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) कायद्यातील सुधारणेची अधिसूचना चुकीची असल्याचा आरोप करीत याविराेधात इंडियन मेडिकल असोसिएशनने ...

मुंबई : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) कायद्यातील सुधारणेची अधिसूचना चुकीची असल्याचा आरोप करीत याविराेधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) संप पुकारला आहे. त्यानुसार, ११ डिसेंबरला कोविड व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य कामे, शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत, अशी माहिती आयएमएने दिली आहे.

११ डिसेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत संप पुकारला जाईल. या दिवशी आयसीयू, सीसीयू याबरोबरच कॅज्युअल्टी, लेबर रुम्स, इमर्जन्सी सर्जरीचे कामकाज सुरू राहील. मात्र इलेक्टिव्ह सर्जरी केल्या जाणार नाहीत, असे असोसिएशनने पत्रकात नमूद केले आहे. ओपीडी, दवाखाने, क्लिनिक्स, प्लान करता येण्याजोग्या आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया स्थगित ठेवल्या जातील.

........................................