Join us

डॉक्टर देणार एक दिवसाचा पगार

By admin | Updated: August 24, 2014 01:43 IST

सोलापूर येथे निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या केली.

मुंबई : सोलापूर येथे निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी शनिवारी एक दिवसाचा मास बंक केला होता. मात्र मुंबईतील आरोग्यसेवेवर याचा फार परिणाम झाला नाही. राज्यातील निवासी डॉक्टर जाधव कुटुंबीयांना एक दिवसाचा पगार देऊन मदत करणार आहेत. रविवारी सकाळी 8 वाजता निवासी डॉक्टर रुजू होणार आहेत, अशी माहिती सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी दिली.
मुंबईतील निवासी डॉक्टर संपावर असूनही आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. जे. जे. रुग्णालयातील आधीच ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. मात्र बाह्यरुग्ण विभाग सुरू असून, शस्त्रक्रियाही झाल्या. 1,6क्क् रुग्णांची बाह्यरुग्ण विभागामध्ये तपासणी करण्यात आली, तर 67 रुग्णांना दाखल करण्यात आल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. 
सायन रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये 6क्क् हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर मोठय़ा 14 आणि लहान 13 शस्त्रक्रिया पार पडल्या. प्रोफेसर, वरिष्ठ डॉक्टर काम करीत असल्यामुळे आरोग्यसेवेवर जास्त परिणाम न झाल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. 
नायर रुग्णालयामध्ये 15क् ते 2क्क् बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्ण तपासले गेले असून, 5क् रुग्णांना दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे डॉ. मनमोहन भागवत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्सोलापूरच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करावी, राज्यातील निवासी डॉक्टरांसाठी एक योजना आणावी, जाधव कुटुंबीयांना मदत मिळावी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात, या चार प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील 14 सरकारी तर 3 महापालिका रुग्णालयांतील सुमारे 3 हजार 5क्क् ते 4 हजार निवासी डॉक्टरांनी मास बंक केला होता.
 
च्जाधव कुटुंबीयांना राज्याने 5क् लाख रुपयांची मदत करावी, ही मागणी ही निवासी डॉक्टरांनी केली आहे. याचबरोबरीने मास बंक केलेल्या निवासी डॉक्टरांनीही जाधव कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरवले आहे. सर्व निवासी डॉक्टरांचा एक दिवसाचा पगार एकत्र करून सुमारे 35 ते 4क् लाख रुपये मदत म्हणून देणार आहेत. रविवारी सकाळी निवासी डॉक्टर रुजू होतील, अशी माहिती डॉ. संतोष वाकचौरे यांनी दिली.