Join us

‘कट प्रॅक्टिस’विरोधात डॉक्टरांचा नारा

By admin | Updated: July 1, 2017 03:02 IST

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांच्या कमिशनविरोधातील बॅनरबाजीनंतर, आता विविध शाखांमधील डॉक्टरांनीही कट प्रॅक्टिसला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांच्या कमिशनविरोधातील बॅनरबाजीनंतर, आता विविध शाखांमधील डॉक्टरांनीही कट प्रॅक्टिसला विरोध दर्शवित पुढाकार घेतला आहे. ‘कट प्रॅक्टिस’ करणे हे चुकीचेच आहे, असे म्हणत, अनेक डॉक्टरांनी याला आळा घातला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या याच पुढाकारामुळे आता लवकरच राज्यात कट प्रॅक्टिसविरोधी कायदा येऊ घातला आहे.डॉक्टरी पेशात ‘कट प्रॅक्टिस’चा व्हायरस दिवसेंदिवस फोफावत असल्याने, या विरोधात आता डॉक्टरांनीच आवाज उठविला आहे. वास्तविक, वैद्यकीय व्यवसायात आपल्या सहकाऱ्यांचा, रुग्णांचा आणि देशाचा आदर करण्याचे ब्रीद महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अ‍ॅथिक्समध्ये नमूद आहे. डॉक्टर ते व्रत घेऊनच सनद घेतात, परंतु गेल्या काही वर्षात या अ‍ॅथिक्सच्या संदर्भात समाजात संशय निर्माण झाला आणि आज कित्येक वर्षांनी त्यातूनच या ‘कट प्रॅक्टिस’च्या विरोधातील आवाजाला दिशा मिळाली आहे. कट प्रॅक्टिस अनअ‍ॅथिकल असल्याने, डॉक्टर आणि रुग्णालयांवर कारवाई झाली पाहिजे, शिवाय याविषयी रुग्णालयांच्या धोरणातही तरतूद असली पाहिजे, असे मत ‘कट प्रॅक्टिस’ला विरोध करणाऱ्या डॉक्टरांनी मांडले.