Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरजेपेक्षा दप्तराची फॅशन अधिक

By admin | Updated: June 3, 2015 22:34 IST

शाळा सुरु होण्यासाठी काहीच दिवसांचा अवधी असतानाच पालक मुलांच्या शालेय खरेदीला लागले आहेत. बाजारात मुलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे

बोर्ली-मांडला : शाळा सुरु होण्यासाठी काहीच दिवसांचा अवधी असतानाच पालक मुलांच्या शालेय खरेदीला लागले आहेत. बाजारात मुलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. विशेषत: दप्तरांच्या खरेदीवर मुलांचा जोर आहे गेल्या काही वर्षात दप्तर हे गरजेपेक्षा फॅशनच झाल्याचे दिसून येत आहे. फॅशनच्या कारणाने या गरजू वस्तूचे भांडवलीकरण होणे साहजिकच आहे. याचा प्रत्यंतर बाजारात फेरफटका मारताना होत आहे. २०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंतची दप्तरे उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांनी दप्तरांचे विविध प्रकार बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत. काईन्सच्या दप्तरांची आवड सध्या कमी झालेली आहे. त्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सला महत्व दिले जात आहे. खाऊचा डबा, कंपासपेटी ठेवण्यासाठी कप्पे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन याबरोबर आतील वह्या पुस्तके व व्यवसाय ठेवण्याचे कप्पे याची पाहणी करुनच दप्तरांची खरेदी होत आले. दप्तर पावसाळ्यात भिजू नये म्हणून रेन कव्हरलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी चांगल्या बँ्रडचे दप्तर किमान २००० पासून पुढे आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवीन वर्ष, नवीन दप्तर ही कल्पना रुजली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दप्तराचे विविध प्रकार बाजारात येत असल्याने नवीन प्रकारचे दप्तर आपल्याला हवे आणि आपल्या मित्रमंडळीपेक्षा आपल्याकडे काही वेगळा प्रकार, रंग किंवा डिझाईन्स आदी असावे या मुलांच्या हट्टापायी पालकांच्या खिशाला चांगलीच चाट बसत आहे. या दप्तरखरेदीवरुन विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये घडणारे संवादही जागोजागी ऐकायला मिळत आहेत. या विविध दप्तरांबाबत मुलांना उत्सुकता असून नवीन फॅशनेबल दप्तरासाठी ते पालकांकडे हट्ट करत आहेत. (वार्ताहर)