Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यायाधीश निवड आयोगात नातलग नकोत’

By admin | Updated: January 8, 2015 02:05 IST

सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगात न्यायाधीश व वकिलांच्या नातलगांना सदस्य म्हणून घेऊ नये,

मुंबई : सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगात न्यायाधीश व वकिलांच्या नातलगांना सदस्य म्हणून घेऊ नये, अशी मागणी करणारे पत्र आॅल इंडिया बार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी व कायदा मंत्री यांना लिहिले़असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ अदिश अग्रवाल यांनी हे पत्र लिहिले आहे़ न्यायाधीश निवड आयोगाचे आम्ही स्वागत करतो़ मात्र याद्वारे होणारी निवड अधिक पारदर्शक होण्यासाठी या आयोगात न्यायाधीश व वकिलांच्या नातलगांची वर्णी लागता कामा नये अन्यथा हा आयोगही विश्वासार्ह राहणार नाही़एखादे न्यायाधीश बढतीसाठी पात्र नसल्यास त्यांचे तत्काळ निलंबन करायला हवे़ निवृत्त न्यायाधीशांची आयोगावर अथवा प्राधिकरणावर नियुक्ती करू नये़ कर्तव्यावर असलेल्या न्यायाधीशांची आवश्यकतेनुसारच अशा पदांवर नियुक्ती करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे़ देशात चार ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येकी एक खंडपीठ स्थापन करावे़ प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करावी, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)