मुंबई : अपघात झाल्यावर फक्त बघ्याची भूमिका न घेता मदतीसाठी पुढे या अथवा वैद्यकीय सेवा क्रमांकावर याबाबत सुचना तरी द्या अशी विनवणी रेल्वे अपघातग्रस्त मोनिका मोरे हीने घाटकोपर भटवाडीचा लाडका दहीहंडी उत्सवादरम्यान केली.
भटवाडी येथील लोकसेवा चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे आयोजिलेल्या दहिहंडी उत्सवात मोनिकाची उपस्थिती विशेष आकर्षणीय होती. दोन्ही हात गमावण्याचे दुख बाजुला सावरुन पुन्हा नव्याने उभी राहीलेल्या मोनिका मोरे उपस्थितीने दहिहंडी उत्सवाला एक वेगळाच रंग भरला होता. मोनिका मोरेकडून प्रेरणा घेवून कोणत्याही क्षणी खचून न जाता पुन्हा नव्याने आयुष्याशी सुरुवात करणो गरजेचे असल्याच्या उद्देशाने मोनिकाला या दहीहंडी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले असल्याचे लोकसेवा चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यावेळी मोनिकाचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारा दरम्यान उप्स्थितांशी बोलताना मोनिका मोरे हीने नागरीकांना अपघात ग्रस्तासाठी नेहमी मदतीचा हात पुढे ठेवा असे आवाहन केले. तसेच अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता, त्यांना नेहमी मदत करा असेही ती म्हणाली.