Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नराधमांचे वकीलपत्र घेऊ नका

By admin | Updated: April 3, 2015 22:41 IST

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्या घटनेत पोलिसांनी दोन नराधमांना मुंब्य्रातून अटक केली आहे. त्या दोघांचेही वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असे आवाहन करणारे निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जिल्हा सचिव शीतल देवळालकर , उप सचिव स्वाती कदम , उपाध्यक्षा सुनीता शेलार , प्राची मोरे , आदींच्या शिष्टमंडळाने कल्याणच्या फौजदारी बार असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅडव्होकेट विलास लांडगे यांना दिले. या संदर्भात फौजदारी बार असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅडव्होकेट विलास लांडगे म्हणाले , येत्या मिटींग मध्ये ते निवेदन ठेवण्यात येणार आहे . या निवेदनावर निर्णय घेतल्यानंतर तो घोषीत होईल.