Join us  

आरक्षणाशिवाय मेगा नोकरभरती नको; मराठा समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 6:16 AM

शहर-उपनगरात आंदोलन; सरकारच्या धोरणाचा निषेध

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण लागू केल्याशिवाय राज्य सरकारने मेगा नोकर भरती करू नये, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी देण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी रविवारी करी रोड, तसेच चेंबूर व गोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्कमाफी देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.कायदेशीररीत्या १६ टक्के आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मेगा भरती होऊन देणार नाही. कायदेशीररीत्या १६ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. न्यायालयात प्रलंबित असलेला निकाल लवकरात लवकर लागावा, या मागण्यांसाठी रविवारी मध्य मुंबईत करी रोड येथील भारत माता सिनेमागृहाजवळ, तसेच गोरेगाव येथील जिजाऊ कट्टा येथे दिवसभर आंदोलन करण्यात आले.कामोठेत मराठा आरक्षणाकरिता ठिय्याकळंबोली : कामोठे येथे मराठा आरक्षणाकरिता मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने शनिवारी आणि रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला-पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी घोषणाबाजी करून शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यभर अशा प्रकारे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांकरिता राज्यभर लाखोंचे मोर्चे काढले. शासनाकडून त्यांना आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. मध्यंतरी काही काळ मोर्चे निघाले नसले तर प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता. न्यायालयाचा या प्रकरणी निर्णय येणे बाकी आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न रेंगाळत चालला असल्याने ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत.शनिवार आणि रविवारी कामोठे पोलीस ठाण्यासमोर मराठा क्र ांती मोर्चाने ठिय्या मांडला. ‘नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण अगोदर करा, नंतर मेगा नोकरी भरती करा’ अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. तसेच आंदोलकर्त्यांनी या वेळी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.राज्यभरात ५७ एसटींचे नुकसानमुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या सुरु असलेल्या आंदोलनात तब्बल ५७ एसटीचे नुकसान झाले आहे. यापैकी बहुतांश एसटी या पंढरपूर मार्गावरील असलेल्याचे समोर आले आहे.राज्यातील कोणत्याही आंदोलनात सॉफ्ट टार्गेट म्हणून एसटी महामंडळाच्या बसला लक्ष करण्यात येते. आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाठी महामंडळाने हजारो एसटींची व्यवस्था केली आहे. मात्र राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनात एकूण ५७ एसटीचे नुकसान झाले असून यापैकी एक एसटी पेटवण्यात आली आहे. विमान प्रवासाच्या धर्तीवर राज्यात देखील एसटी महामंडळाने कडक नियम राबवण्याची गरज आहे. एसटीवर दगडफेक करणाºया व्यक्तीला आयूष्यभर एसटी प्रवासाची बंदी घालण्यात यावी. त्याच बरोबर संबंधित व्यक्तीचे फोटो सर्व एसटी स्थानकावर चिटकवून त्याची माहिती सर्व चालक-वाहक मंडळीना द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

टॅग्स :मराठामराठा क्रांती मोर्चा