Join us

ओव्हरटेक करु न दिल्याने एसटी चालकाला मारहाण

By admin | Updated: December 29, 2014 02:34 IST

ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादात अज्ञात व्यक्तींनी एसटी बस चालकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

नवी मुंबई : ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादात अज्ञात व्यक्तींनी एसटी बस चालकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन - पनवेल मार्गावर राज्य महामंडळाच्या फलटण ते परेल मार्गावरील बस चालकाला मारहाण झाली आहे. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बस मुंबईकडे येत असताना वाशी गाव येथे ही घटना घडली. बसच्या पाठीमागून येणाऱ्या कार चालकाला पुढे जाण्यासाठी जागा हवी होती. परंतु ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करूनही त्याला समोर असलेल्या एसटी बसमुळे पुढे जाण्याकरिता जागा मिळत नव्हती. याचा राग मनात धरून कारमधील तीन व्यक्तींनी वाशी गाव येथे एसटी बस अडवली. त्यानंतर बस चालक धनाजी बोराटे यांना जबर मारहाण करून पळ काढला. या प्रकारात बोराटे यांच्या चेहऱ्याला व शरिरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. भररस्त्यात बस चालकाला मारहाणीचा हा प्रकार घडत असताना कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. या मारहाण प्रकरणी बोराटे यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बोराटे यांना मारहाण करणाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने पळ काढला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.एम. गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)