Join us

‘परीक्षेला लोडशेडिंग नको’

By admin | Updated: October 18, 2014 01:29 IST

पुढच्या वर्षीपासून दहावी व बारावीच्या परीक्षेला परीक्षा केंद्रांना पूर्णवेळ वीजपुरवठा करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.

मुंबई :  पुढच्या वर्षीपासून दहावी व बारावीच्या परीक्षेला परीक्षा केंद्रांना पूर्णवेळ वीजपुरवठा करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
असे आदेश न्यायालयाने शासनाला 2क्क्8 मध्येही दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. याने न्यायालयाचा अवमान झाल्याने नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली. त्याची दखल घेत न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने शासनाचे चांगलेच कान उपटले. उत्सवांच्या काळात विनाखंडित वीजपुरवठा केला जातो; मग परीक्षेला लोडशेडिंग का, असा सवालही न्यायालयाने केला होता. त्यावर परीक्षा केंद्रांना पुरेसा वीजपुरवठा केला जात असल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली. यावर वरील आदेश दिले. (प्रतिनिधी)