Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची सूज येऊ देऊ नका - दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:32 IST

आम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिलो, अविश्रांत मेहनत घेतली. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण सत्ता मिळवली असली तरी सत्तेची कुठलीही सूज येऊ देऊ नका, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्वपक्षीयांना दिला.

मुंबई : आम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिलो, अविश्रांत मेहनत घेतली. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण सत्ता मिळवली असली तरी सत्तेची कुठलीही सूज येऊ देऊ नका, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्वपक्षीयांना दिला.बोरीवली येथील प्रदेश कार्यकारणीत दानवे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मेहनती नेतृत्वामुळेच राज्यातील दुष्काळ, मराठा मोर्चा, काँग्रेस आघाडीने काढलेली संघर्ष यात्रा, शेतक-यांची कर्जमुक्तीसारखे प्रश्न यशस्वीपणे हाताळले आणि जनतेचा विश्वास संपादन केल्याचा दावा दानवे यांनी केला.नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. त्या नगरपालिका निवडणुकीत चौथ्या क्रमांकावरील भाजपा पहिल्या क्रमांकावर पोहचला. राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेले यश जनतेच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचेही ते म्हणाले.