Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करू नये

By admin | Updated: June 13, 2015 22:54 IST

आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू आहे.

मोखाडा : आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू आहे. यामुळे या कार्यालयातील अनेक पदे रिक्त होत आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. बदली झालेले कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागी अन्य कर्मचारी आल्याशिवाय येथील कर्मचाऱ्यांनी कार्यमुक्त करू नये, असे निवेदन माजी उपसभापती बशिर अन्सारी यांनी तहसीलदारांना दिले.तालुक्यात अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक शासकीय खुर्च्या रिकाम्या असून आदिवासी नागरिकांची व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. तसेच दहावी, बारावीचे निकाल लागले असून अ‍ॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांची कागदपत्राच्या पूर्ततेसाठी परवड होऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर)