Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करू नका!

By admin | Updated: November 23, 2014 01:07 IST

मध्य रेल्वेचे डीसी-एसी रूपांतरण गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट असल्याने त्याचा परिणाम गाडय़ांच्या वेगासह गाडय़ा वाढविण्यावर होत आहे.

मुंबई : मध्य रेल्वेचे डीसी-एसी रूपांतरण गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट असल्याने त्याचा परिणाम गाडय़ांच्या वेगासह गाडय़ा वाढविण्यावर होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही अडचण समजून घेत त्यासंदर्भात ज्या काही सुधारणा आवश्यक असतील त्या  तातडीने करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील  अधिका:यांना सूचना केल्या. तसेच प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करू नका असे सांगितले. शनिवारी मध्य व प.रे.च्या महाव्यवस्थापकांसमवेत झालेल्या  बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.
प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी दोन्ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सूचना केल्या. प्रभू यांनी मध्य रेल्वेच्या वाहतुकीत वक्तशीरपणासह दुर्घटना कशा टाळता येतील यावर भर द्यावा याबाबत मार्गदर्शन करत प्रवाशांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्यासही सांगितले. त्यावर म.रे.ने ठाणो-कल्याण मार्गावरील रुळांमधील दोष तसेच अन्य तांत्रिक दोष कुठे असतील यासंदर्भातील विशेष यंत्रणा 1 नोव्हेंबरपासून कार्यान्वित केल्याचे सांगितले. या कामांसाठी 3क्क् कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहेत. सातत्याने ट्रॅक, सिग्नल आणि अन्य तांत्रिक फेल्यूअर कुठे असतील याबाबतची तपासणी करत आहेत. 3क् नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे करून वाहतूक पूर्ववत केली जाईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)