Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त घरांच्या जाहिरातींना बळी पडू नका

By admin | Updated: December 14, 2014 01:55 IST

पोलीस आयुक्तालयामार्फत घोडबंदरला स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशा आशयाची पत्रके सध्या पोलीस कर्मचा:यांच्या हाती पडू लागली आहेत.

ठाणो : पोलीस आयुक्तालयामार्फत घोडबंदरला स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशा आशयाची पत्रके सध्या पोलीस कर्मचा:यांच्या हाती पडू लागली आहेत. परंतु अशा प्रकारची कोणतीही योजना नसून आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन ठाणो पोलिसांच्या मनुष्यबळ विभागाने केले आहे. जाहिरात करणा:यांवर अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही.
ही तथाकथित स्वस्त घरे मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आयुक्त कार्यालयात फे:या मारण्यास सुरुवात केली आहे. खारटन रोड भागात कदम कम्पाउंड येथे संजय आठवले यांच्याकडून अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जात असल्याची माहिती ठाणो पोलिसांच्या मनुष्यबळ विकास विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी दिली. ही घरे मिळवण्याच्या नादात पोलिसांचे आर्थिक नुकसान झाल्यास ठाणो पोलीस आयुक्त कार्यालय जबाबदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अद्याप एकाही पोलीस कर्मचा:याने संबंधित कंपनीत पैसे भरलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)