Join us

'आरेला वनक्षेत्र घोषित करू नका'

By admin | Updated: December 13, 2015 01:37 IST

आरे वसाहतीशी संबंध नसणाऱ्या संस्थांकडून आरेतील झोपडीधारकांच्या हक्कांना बाधा पोहोचविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संस्थांनी संपूर्ण आरे वसाहतीला वनक्षेत्र म्हणून

मुंबई : आरे वसाहतीशी संबंध नसणाऱ्या संस्थांकडून आरेतील झोपडीधारकांच्या हक्कांना बाधा पोहोचविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संस्थांनी संपूर्ण आरे वसाहतीला वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी हरित लवादाकडे केली आहे, परंतु या मागणीला आरेमधील स्थानिकांनी विरोध दर्शविला असून, त्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.जन आधार सामाजिक प्रतिष्ठानच्या म्हणण्यानुसार, आरे वसाहतीला वनक्षेत्र घोषित केले, तर आरेतील आदिवासी बेघर होतील, शिवाय उर्वरित झोपडीधारकही बेघर होतील. येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी, मयुरनगर येथील एसआरए गृहसंकुल, दूधसागर गृहसंकुल, वनराई गृहसंकुल, बिंबीसार नगर गृहसंकुल, म्हाडाचे संक्रमण शिबीर, सारीपुत नगर येथील एसआरए गृहसंकुल, युनिट क्रमांक २ येथील संक्रमण स्टुडिओ, सुग्रास कंपनी युनिट क्रमांक ३२ जवळील इंदिरा नगर विकास संस्था, पोल्ट्रीफार्म मॉडर्न बेकरी या सर्वांनाच बाधा पोहोचेल. झोपडीधारकांसह आदिवासींना बाधा पोहोचू नये, म्हणून या मागणीला विरोध करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)