Join us

वडगावात डीजे, गुलालमुक्त मिरवणूक

By admin | Updated: August 30, 2014 01:35 IST

येथे २६ गणेश मंडळांनी शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात डीजे व गुलालमुक्त मिरवणूक काढून गणेशमूर्तीची स्थापना केली.

वडगाव मावळ : येथे २६ गणेश मंडळांनी शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात डीजे व गुलालमुक्त मिरवणूक काढून गणेशमूर्तीची स्थापना केली. शुक्रवारी वडगाव शहरात घरगुती व मंडळात गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सकाळपासून गणेश भक्तांची बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू होती. मंडळांचे कार्यकर्ते मंडप व सजावटीच्या कामात व्यस्त होते. मावळात सात दिवसांचे गणपती असल्याने त्यांची लगबग सुरू होती. शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते. सकाळपासूनच मंडळाचे कार्यकर्ते वाजतगाजत श्रींच्या मूर्ती आणताना दिसत होते. तसेच शहरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू होता. शहरात ग्रामदैवत पोटोबामहाराज मंदिरासह मंडळांनी भव्य व देखण्या गणेश मूर्तीची रथातून ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. ती पाहण्यासाठी पावसातही लहान-थोर भक्तांनी गर्दी केली होती. वडगावचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)