Join us

दिवाळी विशेष गाडय़ांनाही दिव्यात थांबा नाही!

By admin | Updated: October 16, 2014 22:54 IST

गणोशोत्सवात कोकणात जाणा:या गाडयांना दिव्यात थांबा न देताच मध्य/कोकण रेल्वेने दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पत्रंसह निवेदनाला बगल दिली होती.

अनिकेत घमंडी - डोंबिवली
गणोशोत्सवात कोकणात जाणा:या गाडयांना दिव्यात थांबा न देताच मध्य/कोकण रेल्वेने दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पत्रंसह निवेदनाला बगल दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दिवाळी विशेष गाडय़ांच्या बाबतही केली आहे. त्यामुळे  प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी, यासाठी किमान दिवाळी सुटीतील विशेष गाडय़ांना दिवा स्टेशनात थांबा मिळेल, असे आश्वासनांचे गाजर या प्रवासी संघटनेने दाखवले होते, मात्र रेल्वेने ठेंगा दाखवल्याने संघटनेसह प्रवाशांच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरवले गेले आहे.  सणासुदीनिमित्त मध्य रेल्वे कोकणातील प्रवाशांसाठी गाडय़ा सोडणार आहे,  मात्र यापैकी एकाही गाडीला दिवा येथे थांबा नसल्याने ठाणो जिल्ह्यातील प्रवाशांची परवड कायम राहणार आहे. 
दिवाळीच्या विशेष गाडय़ांनाही ठाण्यानंतर थेट पनवेल येथे थांबा असल्याने असंख्य प्रवासी ठाणो स्थानकांत ठाण मांडून बसतात. त्यांची कोणतीच सोय करण्याचे सौजन्य रेल्वेने दाखवले नसल्याचे गणोशोत्सवात दिसून आले. त्यामुळे दिवा, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर्पयतच्या शेकडो प्रवाशांना प्रचंड हाल सोसून तेथेच रात्र काढावी लागली होती. निदान येणा-या गाडय़ांच्या वेळापत्रकात दिव्यातील गाडय़ांसाठी काहीतरी तरतूद करावी, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे.
आक्रमक असलेली प्रवासी संघटना सुस्तावली -  दिवा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा प्रश्न, तिकिट घराचा प्रश्न, रेल्वे फाटकाची समस्या आदींसह स्थानकातील गदरुल्ले, भिकारी, पाणपोयांसह स्वच्छतागृहाची दुरवस्था यांसह असंख्य प्रश्नांना वाचा फोडणारी दिवा रेल्वे प्रवासी संघटना या प्रश्नाबाबत सुस्तावली आहे का असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. 
या संघटनेच्या कामाचे समर्थन करणारी व त्यास पाठिंबा देणारी उपनगरीय प्रवासी एकता संस्था केवळ कागदी घोडे नाचवण्यातच समर्थन मानत आहे का असा सवालही काहींनी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांना उद्देशून केला आह़े, तर काहींनी खासदार श्रीकांत शिंदेवर तोंडसुख घेतले आह़े 
 
गणोशोत्सवातील अडचणी दिवाळीत नको
4गणोशोत्सवाआधीच खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे डबे घसरले. तेव्हापासून कोकणाकडे जाणा:या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले ते अनंत चतुर्दशीर्पयत कायम राहिले. संततधार पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला, तसेच सिग्नल यंत्रणोतील बिघाड व पावसात उद्भवलेल्या ट्रॅकच्या समस्यांमुळे ऐन गणोशोत्सवात गाडय़ा तब्बल 12 ते 16 तास उशिराने धावल्या होत्या. तशा अडचणी दिवाळीत येऊ नयेत अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली.