Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवा - ठाणेदरम्यान रविवारी विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:07 IST

मुंबई : ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.०० ...

मुंबई : ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० दरम्यान कळवा - मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीम्या / अर्धजलद लोकल दिवा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंडपासून धीम्या मार्गावर वळवल्या जातील. परिणामी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.०० ते ५.०० दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी ९.०० ते ५.००पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या सर्व लोकल वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची लोकल सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी असेल. ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली लोकल सायंकाळी ६.०२ वा. असेल. या ब्लॉकमुळे, काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत. परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक प्रभावित ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.