सुरेश लोखंडे, ठाणेअत्यंत कमी वजनासह विविध स्वरूपाच्या दुर्धर आजाराने ठाणे, पालघर जिल्ह्यातील सुमारे ४८७ बालके पीडित असल्याचे महिला -बालकल्याण विभागाद्वारे प्राप्त झालेल्या अहवालावरून उघड झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांसह पालघर जिल्ह्यातील १३ आदी २२ बालकल्याण प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात तीव्र कमी वजनासह विविध स्वरूपाच्या दुर्धर आजारांनी ४८७ बालके पीडित आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सुमारे ३२३ बालकांचा समावेश असून ठाणे जिल्ह्यातील सुमारे १६४ बालके या जीवघेण्या आजारांमुळे जीव मुठीत घेऊन जगत आहेत. यामध्ये आदिवासी व दुर्गम भागातील बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून येत असून आरोग्य विभागासह बालकांच्या पालकांनीही त्यांच्या पोषक व संतुलित आजाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिला व बालकल्याण विभागाव्दारे या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार व आरोग्य विभागाद्वारे औषधोपचार नियमित केला जातो. पण त्यानंतरची काळजी पालकांनी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेने सांगितले.
जिल्ह्यातील बालके दुर्धर आजाराने जर्जर !
By admin | Updated: December 14, 2014 23:22 IST