Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बदल्यांचे सत्र

By admin | Updated: May 30, 2014 00:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने पोलीस महासंचालकांनी केल्या होत्या

जितेंद्र कालेकर, ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने पोलीस महासंचालकांनी केल्या होत्या. यात दोन वर्षांचा सर्वसाधारण कालावधी पूर्ण केलेल्या ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबईतील ३१ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी काढले आहेत. ठाणे शहर मधून नंदकुमार सातव यांची पुणे ग्रामीणमध्ये तर मेघशाम डांगे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे बदली झाली आहे. याशिवाय, मंगेश सावंत यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तर ठाण्याच्या बीडीडीएसमधून जनार्दन बाबर यांची ठाणे शहर अशी बदली दाखविण्यात आली आहे. सुशिल जावळे हे दहशतवाद विरोधी पथकात रुजू करण्यात आले आहेत. बीडीडीएसच्याच रघुनाथ शिबे यांची मात्र आयुक्तालयाबाहेर खंडाळयाच्या प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर स्वप्निल धुळे यांची चंद्रपूर तर किसन पडवळ यांची प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे त्यांच्या विनंतीवरुन बदली झाली आहे. श्रीकांत कोल्हापुरे यांना विशेष सुरक्षा विभागात तर अनिल पाटील यांना रायगडला पाठविण्यात आले आहे. दिलीप सूर्यवंशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात गेले असून सुनिल गांगुर्डे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पदभार घेतील. ज्ञानेश्वर शिवथरे यांची पुणे शहर, विठ्ठल दबडे - सोलापूर ग्रामीण, दिनेश अग्रवाल हेही आता दहशतवाद विरोधी पथकात आले आहेत. ठाणे ग्रामीण मधून बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये शिरीष जाधव यांची पदोन्नतीवर धुळे येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आता निरीक्षक म्हणून धुळयाला जाणार आहेत. याशिवाय, पोलीस निरीक्षक शंकर बडवे यांची खंडाळयाच्या प्रशिक्षण केंद्रात, प्रदीप माने आणि राजीव चव्हाण यांची गुन्हे अन्वेषण विभागात तर विनोद चव्हाण यांची लोहमार्ग, मुंबई याठिकाणी बदली झाली आहे. पांडुरंग दराडे यांची मात्र जिल्हयातच अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये बदली दाखविण्यात आली आहे. अविनाश मोहिते हे खंडाळयाच्या प्रशिक्षण केंद्रात, दशरथ खैरे नानवीजच्या, दौंडच्या प्रशिक्षण केंद्रात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून सतिश पाटील यांची मुंबईत तर सुनिल खळदकर यांची नागरी हक्क संरक्षण विभागात बदली झाली आहे. रफिक बागवान नागपूर शहर, दीपक पवार- सोलापूर ग्रामीण, यशवंत चव्हाण यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभगात पाठविण्यात आले आहे. तर नवी मुंबईच्या कोकण भवन येथील विशेष जाती प्रमाणपत्र तपासणी समितीमधील प्रदीप सुर्वे यांची नवी मुंबईत तर राजेंद्र जाधव यांची मुंबई शहर आयुक्तालयात बदली झाली आहे.