Join us  

२ हजारांची लाच घेताना सहजिल्हा निबंधक अधिकारी जाळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 9:30 PM

वांद्रे येथील सहजिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर सहायक दुय्यम निबंधक सुनंदा चिंतामण मोरे (५२) यांना २ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

मुंबई  - वांद्रे येथील सहजिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर सहायक दुय्यम निबंधक सुनंदा चिंतामण मोरे (५२) यांना २ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी ही कारवाई केली आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅम्प रजिस्ट्रेशनचे काम करत असलेल्या तक्रारदार यांनी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाच्या मालमत्तेसंदर्भात इंडेक्सची प्रत मिळण्यासाठी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयाच्या इमारतीत धाव घेतली. येथील सहजिल्हा निबंधक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. हा अर्ज अभिलेख कक्षातील लाचखोर सहायक दुय्यम निबंधक मोरे यांच्याकडे आला. याच दम्यान तक्रारदार यांनी मोरेंकडे पाठपुरावा सुरु केला. तेव्हा १५ जून रोजी त्यांनी काम पूर्ण करण्यासाठी २  हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी तत्काळ एसीबीकडे धाव घेतली. तपासात मोरे यांनी पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ठरल्याप्रमाणे, तक्रारदार यांनी मोरे यांना २ हजार रुपये देण्यास होकार दिला. गुरुवारी दुपारी ते मोरे यांना पैसे देण्यासाठी कार्यालयात गेले. त्याच दरम्यान २ हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या