जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हयांमध्ये शांततेत पार पडली. सर्वच १४ तालुक्यांमधून ९४ टक्के मतदान झाल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्हा बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. १९५८ ते १९९९ पर्यन्त काँग्रेसची सत्ता होती. आर. सी. पाटील हे १९७६ पासून जिल्हा बँकेवर संचालक आहेत. १९८६ ते १९९६ या दहा वर्षांच्या काळात तेच अध्यक्ष होते. १९९९ मध्ये काँग्रेसचे बा. का. पाटील निवडून आले आणि त्यांनी आरसींची बँकेवरील सत्ता खेचून आणली. २७ पैकी बा. कां च्या बाजूने १८ तर आर. सींच्या गटातील पांडुरंग पाटील यांना ९ मते मिळाली. त्यानंतर २००१ ते २००५ या चार वर्षांच्या कालावधीतही राष्ट्रवादीचे बा. का. पाटील हेच अध्यक्ष होते. साधारण १९९९ ते २०१४ या १५ वर्षांच्या काळात बँकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे.आता पंचवार्षिक निवडणूकीला राष्ट्रवादी, कॉग्रेस, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित येऊन ‘सहकार पॅनल’ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी वसई विकास आघाडीला सोबत घेऊन ‘लोकशाही सहकार’ ची निर्मिती केली. सहकार पॅनलचे आठ संचालक आधीच बिनविरोध आल्यामुळे सत्ता मिळविण्यास तीन संचालकांची गरज असली तरी बहुमतांनी विजयी होऊ आणि सत्ता काबीज करु, असा विश्वास माजी अध्यक्ष आणि बिनविरोध निवडून आलेले संचालक बाबाजी पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे. या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद‘सहकार पॅनल’मध्ये प्रभारी अध्यक्ष देविदास पाटील यांच्यासह माजी अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील भिवंडीतू तर कल्याणमधून संचालक अनंत शिसवे, माजी अध्यक्ष अशोक पोहेकर, माजी अध्यक्ष आर. सी. पाटील यांचे पुत्र अरुण पाटील, संचालिका भावना डुंबरे, विद्या वेखंडे तर संचालक भाऊ कुऱ्हाडे आणि ठाणे ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे तर ‘लोकशाही सहकार’ पॅनलमधील माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे, कमलाकर टावरे, अनिल मुंबईकर, राजेश पाटील, फिलीप मस्तान आणि ठाणे जि. परिषदेच्या माजी अध्यक्षा रेखा पष्टे नशीब अजमावत आहेत.तर आमचा विजय नक्कीच> तर आमचा विजय नक्कीच होईल, असा दावा शिवाजी शिंदे यांच्या पॅनलने केला आहे. यंदा प्रथमच सत्ताधाऱ्यांनीही सामंजस्याची भूमीका घेऊन एकत्रित येऊन सहकाराची भूमीका घेतल्याने मतदारांची चांगलीच कोंडी झाली. तरीही सत्ता कोणाला मिळेल, हे आता ७ मे रोजीच ठरणार आहे.मतदानाची आकडेवारी अंबरनाथ (८९.६०), भिवंडी (९८.४४), डहाणू (९२.४२), जव्हार (१००), कल्याण ( ९३.६१), मोखाडा (९३.१०), मुरबाड (९८.६८),पालघर (९८.६७), शहापूर (९८.८३), तलासरी (८५.७१), ठाणे (९३), वसई (९२.९१), विक्रमगड - (९४.१२), वाडा (९६.३३)
जिल्हा बँक निवडणूकीत ९४ टक्के मतदान
By admin | Updated: May 6, 2015 01:38 IST