Join us

मुंबई-ठाणे क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:10 IST

मुंबई : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अनाथांना वयाच्या २८व्या वर्षापर्यंत ...

मुंबई : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अनाथांना वयाच्या २८व्या वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित करून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई-वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

सरकारने ठरवून दिलेल्या इतर अटींची पूर्तता करणाऱ्या अनाथांना तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही शिधावाटप विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक : ०२२-२२८५२८१४ (स. १० ते सायं. ६) वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबईचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी केले आहे.