Join us  

आदिवासी पाड्यांसह मजूरांना अन्नधान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 7:14 PM

कोरोनामुळे घरात अडकलेल्यापैकी गरीब नागरिकांना व विशेषत्वाने स्थलांतरीत मजूरांना भारतीय नौदलातर्फे अन्नधान्य व जेवण देण्यात येत आहे. 

मुंबई ः कोरोनामुळे घरात अडकलेल्यापैकी गरीब नागरिकांना व विशेषत्वाने स्थलांतरीत मजूरांना भारतीय नौदलातर्फे अन्नधान्य व जेवण देण्यात येत आहे. नौदलाने ही मदत राज्य सरकारच्या प्रशासनाकडे दिली आहे. मोठ्या संख्येने अडकलेल्या या गरीब मजूरांचे पैशाअभावी जेवणाचे हाल होत होते. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत नौदलाला मदतीचे आवाहन केले होते त्यानंतर नौदलाने पश्चिम मुख्यालयातर्फे अडीचशे पेक्षा जास्त रेशन कीट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले. मुसाफिर खाना, एशियाटिक सोसायटी, काळबादेवी येथे गरजूंना देण्यात आले. बुधवारी कामाठीपुरा येथील बांधकाम मजूरांना नौदलातर्फे ५०० रेशन कीट देण्यात आले. 

देशासह राज्यामध्येही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे केंद्र करकारने २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून बोरीवली येथील आदिवासी पाडा आणि कांदिवली पूर्व येथील भीमनगर येथील झोपडपट्टीतील कामगारांना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि समाजसेवक महेबूब शेख यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्याचे वाटप करत मदतीचा हात पुढे केला आहे.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये अचानक लॉकडाऊन घोषीत केला, मात्र यामुळे मुंबई शहरांतील कामगार वर्गांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे आदिवासी पाड्यातील आकाराची भट्टी, देवी पाडा आणि भीमनगर येथील झोपडपट्टीतील गरजूवंतांना दरेकर आणि शेख यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोफत अन्नधान्य वाटप करत मदतीचा हात देण्यात आला. आदिवासी पाडा आणि भीमनगरातील घरकाम महिला आणि नाका कामगार असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भीमनगर येथील झोपडपट्टीला सन २०१५ साली लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनावेळी झोपडीधारकांना शेख यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस