Join us

गोविंदांकडून रुग्णालयात तोडफोड

By admin | Updated: September 8, 2015 00:13 IST

ठाणे - बेलापूर रोडवर रविवारी रात्री गोविंदा पथकातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला. पथकातील ५० ते ६० तरुणांनी डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याचा आरोप करीत

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोडवर रविवारी रात्री गोविंदा पथकातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला. पथकातील ५० ते ६० तरुणांनी डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याचा आरोप करीत वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये तोडफोड केली. रुग्णवाहिकेच्या काचा व हजेरी मशीनही फोडली. नवी मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान जवळपास १२ गोविंदा किरकोळ जखमी झाले. रात्री उशिरा गोविंदा पथकासोबत येणाऱ्या कांबळे नावाच्या व्यक्तीचा खैरणेगावाजवळ अपघात झाला. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रुग्णवाहिकेमध्ये त्यांना पालिका रुग्णालयात नेले. गोविंदा पथकामधील तरुण यावेळी रुग्णालयामध्ये आले. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा समज झाल्यामुळे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनास धारेवर धरले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील हजेरी मशीन व इतर साहित्याची तोडफोड केली. तोडफोडीविषयी अद्याप कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नाही. (प्रतिनिधी)