Join us  

तोतया अधिका-यांचा अमेरिकन नागरिकांना गंडा, मालाडमधील दोन बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त,१३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:21 AM

अमेरिकास्थित नागरिकांना अंतर्गत महसूल सेवा (इंटरनल रिव्हेन्यू सर्व्हिसेस, आयआरएस) विभागातील अधिकारी बोलत असल्याचे भासवून कोट्यवधीचा गंडा घालणाºया टोळीचे बिंग गुन्हे शाखेने फोडले आहे.

मुंबई : अमेरिकास्थित नागरिकांना अंतर्गत महसूल सेवा (इंटरनल रिव्हेन्यू सर्व्हिसेस, आयआरएस) विभागातील अधिकारी बोलत असल्याचे भासवून कोट्यवधीचा गंडा घालणाºया टोळीचे बिंग गुन्हे शाखेने फोडले आहे. या फसवणुकीसाठी या टोळीने मालाडमध्ये कॉल सेंटर थाटले होते. गुन्हे शाखेने मालाडमधील ही दोन बेकायदेशीर कॉल सेंटर्स उद्ध्वस्त करीत १३ जणांना अटक केली.मालाड पश्चिमेकडील काचपाडा येथील अगरवाल बी २-बी आणि चिंचोली बंदर रोड परिसरातील आदित्य इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात कॉल सेंटरच्या नावाखाली गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखा ३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने बुधवारपासून या ठिकाणी सापळा रचला. येथे कॉल सेंटरच्या नावाखाली लॅपटॉप आणि संगणकाच्या मदतीने इंटरनेटद्वारे (वॉईस ओवर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे) ही मंडळी अमेरिकास्थित नागरिकांशी संपर्क साधायची. अंतर्गत महसूल सेवा विभागातील अधिकारी असल्याचे सांगून त्यांना येथील कर भरा, असे सांगून फसवणूक केली जात असे. अटक आरोपींकडून ८ सीपीयू, ९ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर आणि १४ मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. मालाड आणि बांगुरनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. यामागे आंतरराष्टÑीय रॅकेट असण्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे.मालाडचा दुबे मास्टरमाइंडमालाडचा रहिवासी असलेला अभिषेक दुबे हा यामागील मास्टरमाइंड आहे. त्याने सोहेल मुस्तफा शेख (२४), जरार आलमदार हैदर (२४), शादाब बशीर सय्यद (२१) यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये ग्रे आय एन सी नावाने कंपनी उघडून कॉल सेंटर थाटले होते.पहिलीच नोकरी महागात पडलीअटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी हेमंत दीपक गायकवाड (२३) हा तरुण भाऊबीजेच्या दिवासापासून या ठिकाणी कामाला लागला होता. तो एजंट व मर्चंट म्हणून काम करत होता. त्याला या टोळीबाबत काहीच माहीत नव्हते. ही त्याची पहिलीच नोकरी असल्याचे समजते.

टॅग्स :गुन्हा