Join us

ठाणे जिल्ह्यात धुळवडीचा बेरंग

By admin | Updated: March 6, 2015 23:09 IST

स्वाइन फ्लूचे सावट सर्वत्र असल्याने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी धुळवडीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले होते. तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.

ठाणे: स्वाइन फ्लूचे सावट सर्वत्र असल्याने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी धुळवडीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले होते. तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. शहरी भागात सिनेकलाकारामुळे तसेच लावणीच्या कार्यक्रमाने धुळवडीला चार चॉंद लागल्याचे दिसून आले.त्यातच यंदा नैसर्गिक रंगाची उधळण प्रामुख्याने दिसत होती. या सणाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. तर शहरात वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहिम राबवली. ठाणे शहरात होळीच्या रात्री धुळवड खेळण्याच्या वादातून एकावर कोयत्याचे वार झाले. टिटवाळयात दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला.तर डोळखांबमध्ये जीप चालकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली.ठाणे बाजारपेठेतील, नारळवाला चाळ येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाने यंदा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी बालकलाकार शनय भिसे उपस्थित होता. लुईसवाडीत माजी महापौर अशोक वैती यांनी लावणीचा कार्यक्रम आयोजित आला होता. त्यावेळी ठाणेकर लावणीच्या ठेक्यात रंगले होते.तर कोपरीतील मंगला हायस्कूल येथेही होळी-मिनल कार्यक्रमातून रंगाची उधळण करण्यात आली. बुधवारी मराठी सिनेकलाकारांनी जिद्द शाळेतील मुलांसोबत होळीसह रंगपंचमी साजरी केलीहोळी नियमांत तर धुळवड शांततेत!डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरातील चेन स्रॅचिंगसह गँगवॉरची संभाव्यता लक्षात घेत होळीसह धुळवडीच्या दिवसात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील मानपाडा, रामनगर, टिळकनगर, विष्णूनगर आदी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांची सातत्याने गस्त घालण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारच्या होळी नियमांत आणि शुक्रवारची धुळवड शांततेच्या वातावरणात पार पडल्याचे निदर्शनास आले.होळीच्या रात्री होणारी गडबड गोंधळ यंदा फारशी दिसून आली नाही. त्यावेळी वाजणारे ढोल-डिजेही पोलिस यंत्रणेच्या सूचनेनूसार वेळेतच बंद झाले. त्यामुळे सोसायट्यांमध्ये होळया रात्री उशिरापर्यंत जळत असल्या तरीही नागरिकांनी वेळेतच घरी जाणे पसंत केल्याने सुरक्षा यंत्रणेवर फारसा ताण पडला नाही. ४राज्य राखीव दल ही पोलिसांची विशेष तुडकीही डोंबिवली पूर्वेत गुरुवारी दुपारपासून सज्ज होती.शुक्रवारी दुपारच्या वेळेत येथील शिवमंदिर परिसरात उद्भवलेला किरकोळ गोंधळाची स्थितीही या दलासह रामनगर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे एका नागरिकाने सांगितले.४विशेष म्हणजे पूर्वेकडे ट्रॅफिक पोलिस अधिकारी ए. ह.गालींदे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तसेच शुक्रवारीही दुपारपर्यंत विशेष ड्यूटी करत वाहतूक नियमांचा भंग करणा-यांवर कारवाई केली. विनापरवाना गाड्या चालवणे, ट्रीपल सीट वाहने चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, बॅज नसणे, यासह रिक्षा चालकांचा गणवेश नसणे आदींन्वये कारवाई केली. मीरा-भार्इंदरमध्ये होळी व धुळवड उत्साहात साजरीभाईंदर : मीरा-भार्इंदर शहरात सर्व वयोगटातील आबालवृद्धांनी होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. केवळ तरुणाईलाच होळी व धुळवडीची ओढ असलेला समज बाजूला सारुन महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध व तरुणाईने मोठ्या जोशात हे सण साजरे केले. धुळवडीच्या आदल्या दिवशी होणाऱ्या होळीला नानारुपांनी सजविण्यात आले. होळी पेटविल्यानंतर सुवासिंनींनी होळींचे पूजन केले. त्यावेळी होळीतील विस्तव घरात नेल्यास घरातील अपप्रवृत्ती नष्ट होत असल्याच्या दंतकथांमुळे अनेकांनी होळीतील विस्तव घरी नेण्यासाठी गर्दी केली होती. शहरात आगरी समाजातील होळीला मोठ्या मान असतो. तीला सजवून तीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पुजन करुन तीला पेटविले जाते. यात सुपारी, एरंडा अथवा इतर झाड उभे करुन त्यालाच अग्नि दिला जातो. होळी पेटविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्य््राा धुळवडीला त्याचवेळी सुरुवात केली जाते. शहरात अपुरा पाणीपुरवठा असला तरी अनेक हौशींनी पाण्याचे टंँकर मागवून धुळवड साजरी केली. तसेच पारंपारिक रंगोत्सवाचे आयोजन केले होते.