Join us

रुग्णालयातच वाढला आजारांचा धोका!

By admin | Updated: July 26, 2014 23:00 IST

पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवा, कुठेही पाणी साठू देऊ नका.

पूजा दामले - मुंबई
पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवा, कुठेही पाणी साठू देऊ नका. या पाण्यात होणा:या डासांच्या उत्पत्तीमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची लागण होऊ शकते, अशी जनजागृतीपर जाहिरात महापालिकेतर्फे करण्यात येते. मात्र महापालिकेच्याच केईएम रुग्णालयामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे पाणी आणि रुग्णालयातील सांडपाणी साचून राहिले आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष नसल्याने रुग्णालयातच आजाराचा धोका निर्माण झाला आहे.
केईएम रुग्णालयाच्या जुन्या रुग्णालय इमारतीमध्ये असलेल्या निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आणि बालरोगचिकित्सा वॉर्ड यांच्या बाहेर असलेल्या रिकाम्या जागेमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. गेल्या आठवडय़ात असलेल्या पावसामुळे या भागात पाणी साचले असल्याचा अंदाज होता. मात्र गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत पावसाने उसंत घेतली आहे. तरीही या भागातील साचलेले पाणी कमी झालेले नाही. कारण या पाण्यात रुग्णालयातील सांडपाण्याची भर पडत आहे. 
या साचलेल्या पाण्यामध्ये मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास होते. यामुळे रुग्णालयातच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
रुग्णालयातील सांडपाणी वाहून नेणा:या यंत्रणोत बिघाड झाल्यामुळे हे सांडपाणी रुग्णालयाच्या आवारात साठत आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही. 
 
च्गेल्या आठ ते दहा दिवसांपासून साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती झाल्यास याचा धोका रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाइकांना आणि त्याचबरोबरीने निवासी डॉक्टरांनादेखील आहे. 
च्ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्याच्याच बाजूला लहान मुलांचा वॉर्ड आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास त्यांना डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार लवकर होऊ शकतात. 
च्निवासी डॉक्टरही याच बाजूला राहतात. यामुळे निवासी डॉक्टरांनादेखील डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची लागण होऊ शकते.