Join us  

संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 5:52 AM

शासनाचे परिपत्रक : कर्मचारी मात्र संपावर ठामच

मुंबई : कामगार, कर्मचाºयांच्या देशव्यापी २६ नोव्हेंबर रोजी होणाºया संपात सहभागी होण्यावर राज्यातील कर्मचाºयांच्या प्रमुख संघटना ठाम असून सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे संपात सहभागी झालात तर शिस्तभंगाची कारवाई करु आणि त्या दिवशीचा पगारही मिळणार नाही असे राज्य सरकारने बजावले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचारी व कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी या लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विविध महामंडळांमधील कर्मचारी संघटना, शिक्षकांच्या विविध संघटना तसेच राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटेने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे आणि सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्र विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली. कर्मचारी मोठ्या प्रमाणात या संघटनांचे सदस्य आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघ संपात नसेल पण त्यांनी मागण्यांना पाठिंबा दिला आहे. आमचाही मागण्यांना पाठिंबा आहे पण आमच्या संघटनेचे सदस्य काळ्या फिती लावून काम करतील असे सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने म्हटले आहे.

कामावर न येणाऱ्यांना आजचा पगार मिळणार नाहीn शासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे ही गैरवर्तणूक समजली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशीचा पगार मिळणार नाही, असे परिपत्रक शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी काढले.n संपकाळात कार्यालये नेहमीप्रमाणे उघडणे व सुरू ठेवणे यासाठी गरज भासल्यास गृहरक्षक वा पोलीस दलाची मदत घ्यावी, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. विभागप्रमुखांनी कार्यालय सोडू नये, संपाच्या दिवसाची रजा मंजूर करू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :संपमुंबई