मुंबई : आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसाने मुंबापुरीला झोडपल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आपत्तीशी सामना करण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाला अद्ययावत यंत्रणेसह हायटेक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची अवस्था ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झाली आहे़ अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये या कक्षात तारांबळ उडते़ व्हिडीओ वॉल, नियंत्रण सॉफ्टवेअरच्या प्रभावी उपयोगाकरिता जागा अपुरी आहे़ त्यामुळे मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अद्ययावत यंत्र आणि साधनसामग्रीसह कक्ष स्थलांतरीत होईल. (प्रतिनिधी)
आपत्ती नियंत्रण कक्ष हायटेक होणार
By admin | Updated: June 27, 2015 01:37 IST