Join us

बेपत्ता बॅँक अधिकाऱ्यांचे गूढ कायम, अपहरणाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 07:04 IST

चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका खासगी बॅँकेतील वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

मुंबई : चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका खासगी बॅँकेतील वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबईत मिळालेल्या मोटारीतील रक्ताच्या नमुने घेण्यात आले असून ते त्यांचेच आहेत, का , याची पडताळणी केली जात असल्याचे अधिकाºयाकडून सांगण्यात आले. त्यासाठी संघवी यांच्या आई-वडीलांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.सिद्धार्थ हे मलबार हिल परिसरात कुंटुबियासमवेत रहातात. वरळीतील कमला मिल परिसरातील खासगी बॅँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून बुधवारी सकाळी ते कामासाठी निघून गेल्यानंतर पुन्हा घरी परतले नाहीत.