Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगअभावी वाहनचालकांची गैरसोय

By admin | Updated: June 16, 2015 23:00 IST

रसायनी परिसराचा केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहोपाडा शहरात वाढती वसाहत, नवीन झालेली कॉलेजेस, कार्यालये

मोहोपाडा : रसायनी परिसराचा केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहोपाडा शहरात वाढती वसाहत, नवीन झालेली कॉलेजेस, कार्यालये तसेच कारखानदारी व त्यांच्या वसाहती यामुळे येथील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये वाढ झाली आहे.मोहपाडा बाजारपेठेत सायंकाळी नेहमीच टॅ्रफिक जाम होते. आसपासच्या गावातील नागरिक बाजारहाटासाठी येतात. तेव्हा वाहने कुठे उभी करावी, हा प्रश्न निर्माण होतो. वाहनतळ झाल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल. काही वेळा दुकानासमोरही दुचाकीस्वार वाहने लावतात. या दुचाकीस्वारांना पर्याय नसल्यामुळेच ही वाहने कोठेही लावली जातात. त्यामुळे दुकानात ग्राहकाला जाणेही कठीण होते. मोहोपाडा शहरात वाहनतळ तयार करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)