Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

By संतोष आंधळे | Updated: November 3, 2023 12:24 IST

मरिन ड्राइव्ह येथील चंदनवाडी येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित असणारे व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे गंभीर आजारामुळे शुक्रवारी निधन झाले. ते महिनाभरापासून आजारी होते. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गिरगावातील बेडेकर सदन येथून अंत्ययात्रा निघणार असून मरिन ड्राइव्ह येथील चंदनवाडी येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.  गिरगावातील हॉटेल व्यावसायिक अनिल टेंबे यांच्या आणि बेडेकर कुटुंबियांशी अतिशय जवळचे संबध होते. त्यांनी सांगितले कि, " बेडेकरांच्या अतुल आणि अजित या दोन मुलांनी लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थाचा व्यवसाय देशाबाहेर घेऊन गेले त्यासोबत त्याची वाढ केली. तसेच त्यांनी रेडी टू इट या प्रकारातील खायद्यपदार्थाची सुरुवात केली होती. अतुल बेडेकर अतिशय हुशार आणि मनमिळावू स्वभावाचे होते. माझा परिचय त्यांचा अगदी लहानपणापासूनचा होता. त्यांच्या कडून आमच्या हॉटेल मधील खाद्यपदार्थकरिता मसाला आतापर्यंत घेत आहोत."

टॅग्स :मुंबई