मुंबई : शेकडो बालकांची माय म्हणून सिंधूताई सपकाळ ओळखल्या जातात. या आईची थेट भेट व संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांना सिंधूतार्इंचे विचार ऐकता येणार आहेत. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.दक्षिण-मध्य मुंबई काँग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक १९२ आणि धम्मरत्न सामाजिक संस्थेतर्फे ‘सिंधूताई सपकाळ, थेट भेट व संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता केशवराव दाते पटांगण, अशोकवाडी, आगाशे पथ, दादर (प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सिंधूतार्इंशी थेट भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 03:45 IST