Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांची चोरी करुन इतर राज्यात विक्री करणाऱ्या आरोपींना दिंडोशी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 18:02 IST

यावेळी चौकशी दरम्यान त्यांच्याकडील गाडीचे कागदपत्रे बनावटी असल्याचे समोर आले.

मुंबई: दिंडोशी पोलिस ठाणे हद्दीतील दिंडोसी रोडवर दिनांक २ डिसेंबरला सायंकाळी वाहन तपासणी साठी स्टाफ नेमण्यात आला होता.एका वाहनाला स्टाफने थांबवली व त्यामधील दोन इसमांची चौकशी केली.पण या दोन इसमांना गाडीच्या कागदपत्रांबाबत व्यवस्थित माहिती देता येत नव्हती. त्यामुळे त्या दोघांना पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले.

यावेळी चौकशी दरम्यान त्यांच्याकडील गाडीचे कागदपत्रे बनावटी असल्याचे समोर आले. यावरुन ती गाडी चोरी करुन आणल्याचे निष्पन्न झाले. गाडी ताब्यात घेण्यात आली. अधिकची चौकशी करुन त्यांच्याकडून अजून तीन वाहनांची माहिती घेऊन त्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरपी गाड्यांची चोरी करुन इतर राज्यात विकत होते. त्यांना गाडीचे बनावटी कागदपत्रे कोण बणवून देत होते याचा तपास सुरु असल्याचे दिंडोशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले आहे.

टॅग्स :चोरीमुंबई