Join us
Daily Top 2Weekly Top 5

ढोंगी बाबाविरोधात दिंडोशीत गुन्हा दाखल

By admin | Updated: January 25, 2017 05:13 IST

मूल होण्यासाठी ‘गुप्त’ आशीर्वाद देण्याचे सांगत महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार रविवारी मालाडमध्ये उघड झाला आहे

मुंबई : मूल होण्यासाठी ‘गुप्त’ आशीर्वाद देण्याचे सांगत महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार रविवारी मालाडमध्ये उघड झाला आहे. एका महिलेनेच या बाबा आणि स्वत:च्या पतीविरोधात तक्रार केली. या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक करत या बाबाचा शोध सुरू केला आहे. मालाडच्या स्कॉटर्स कॉलनीत तक्रारदार महिला पती अब्दुल खानसोबत (नाव बदलले आहे) राहते. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षे होऊनसुद्धा त्यांना मूल होत नव्हते. तेव्हा याच परिसरात राहणाऱ्या एका बाबाने अब्दुलला त्याच्या पत्नीसह बोलावले. त्याने पतीला बाहेर उभे करून त्याच्या पत्नीसोबत रात्रभर लैंगिक अत्याचार केले. सकाळी बाबा बाहेर गेल्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या पतीला त्याच्या पत्नीने घडलेला प्रकार सांगितला. तसेच हे सर्व तो तिच्या पतीच्या संमतीने करतोय, असेही बाबाने सांगितल्याचे तिने पतीला सांगितले. तरीदेखील तीन वेळा पतीने त्याच्या पत्नीला त्याच्याजवळ जाण्यास धमकावले. याला कंटाळून अखेर तिने दिंडोशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुलच्या मुसक्या आवळल्या. मात्र ढोंगी बाबा फरार झाला आहे. (प्रतिनिधी)