Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिंपल यांची सुनावणी १० मार्चला

By admin | Updated: March 7, 2015 01:33 IST

मालमत्तेवर केवळ माझाच अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या याचिकेवर येत्या १० मार्चला सुनावणी होणार आहे.

मुंबई : दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची एकमेव कायदेशीर पत्नी असल्याने त्यांच्या मालमत्तेवर केवळ माझाच अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या याचिकेवर येत्या १० मार्चला सुनावणी होणार आहे.खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी यांनी न्यायालयात धाव घेऊन मालमत्तेवर दावा केला़ खन्ना यांच्या अखेरच्या दिवसांत मी त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती़ते आजाराने अधिकच ग्रस्त झाल्यानंतर डिंपल, अभिनेत्री टिष्ट्वंकल खन्ना व अभिनेता अक्षय कुमारने मला घराबाहेर काढले़ त्यामुळे मालमत्तेची वाटणी मिळावी व घराबाहेर काढणाऱ्यांनाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवावा, अशी मागणी अडवाणी यांनी केली़ त्याची दखल घेत न्यायालयाने डिंपल, अक्षय व टिष्ट्वंकल यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले़ त्यानंतर तत्काळ डिंपल यांनी याचिका केली़