Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप प्रभावळकर यांना पुरस्कार

By admin | Updated: October 22, 2014 00:12 IST

मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कै. लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कै. लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा ७९वा वर्धापन दिन २८ आॅक्टोबर रोजी साजरा होणार असून, त्यानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.मराठी यशवंत पुरस्कार केसरी पाटील यांना, वैचारिक साहित्य पुरस्कार नीरा आडारकर, समाजवादी विचारवंत पुरस्कार अ‍ॅड. गोविंद पानसरे तर साहित्य सेवा संघ गौरव पुरस्कार वसंत ठुकरुल आणि कथाकार शांताराम पुरस्कार शरद पुराणिक यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक अध्यक्षपद भूषविणार आहेत. या समारंभादरम्यान, अशोक बेंडखळे संपादित ‘साहित्य’ दिवाळी अंकाचेही प्रकाशन होणार आहे.