मुंबई: तीन लाखांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या एमएचबी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या घराच्या झडतीमध्ये एसीबीला एक महत्त्वपूर्ण डायरी मिळाली आहे. त्यात ज्या-ज्या व्यक्तीकडून पैसे घेण्यात आले आहेत. त्यांची नावे असल्याचे समजते. त्याचप्रमाणे घरामध्ये ८० हजारांच्या रोकडसह २० विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले.दरम्यान, चव्हाण यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोरीवलीत अनधिकृत जागेवर उभारलेल्या स्टुडिओबाबत कारवाई न करण्यासाठी चव्हाण यांनी स्टुडिओ मालकाकडे ४ लाख देण्यासाठी तगादा लावला होता. त्याने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी तीन लाख रुपये घेत असताना त्यांना रंगेहाथ पकडले. बुधवारी त्यांचे पोलीस ठाण्यातील कार्यालय व घराची झडती घेतली. त्यात सापडलेल्या डायरीत बिल्डर, उद्योजक, बारमालक यांच्याकडून रक्कम स्वीकारल्याच्या नोंदी आहेत. त्यांच्या बॅँक अकाऊंट व इतर व्यवहाराची माहिती घेणे सुरू आहेडायरीत नावे असणाऱ्यांचा जबाब ?सुभाष चव्हाण यांच्या घरी सापडलेल्या डायरीमध्ये अनेकांची नावे आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्डर, उद्योजक, बारमालकांची त्यामध्ये नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यकता वाटल्यास त्यांचा जबाब घेण्यात येईल, असेही सांगितले.
लाचखोर वरिष्ठ निरीक्षकाच्या घरी सापडली ‘डायरी’
By admin | Updated: December 31, 2015 01:23 IST