१२७ मृत्यू : ६ हजार ७७६ रुग्ण झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी ५ हजार २२९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ झाली आहे. तर, दिवसभरात लागण झालेल्यांहून अधिक म्हणजेच ६ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १७ लाख १० हजार ५० इतकी असून सध्या राज्यभरात ८३ हजार ८५९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के एवढे झाले आहे, तर मृत्युदर २.५८ टक्के आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात १२७ काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७ हजार ५९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.