Join us  

आवाज तपासणीद्वारे कोरोना रुग्णांचे निदान करा, महापौर नरेश म्हस्के यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 3:44 PM

कोरोनाचे निदान लवकर व्हावे आणि त्याला रोखण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. त्याच अनुषंगाने आता ठाण्यात आवाज तपासणीद्वारे कोरोना रुग्णांचे निदान करण्यात यावे अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

ठाणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंबहुना या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी सर्व स्तरावरु न युध्दपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी आजवर अनेक निदान व उपचार पध्दती पुढे येत आहेत व त्यानुसार संशयीत व्यक्तींची तपासणी करु न करोनाचे निदान करण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून एखाद्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता आवाज व श्वसन निदान पध्दती पुढे येत आहे. या पध्दतीमध्ये करोना संशयीत सर्वसामान्य व्यक्तींनी घरच्या घरीच आपल्या नियमित आवाज व श्वसनामध्ये काही बदल झाले असल्यास त्याची नोंद स्वत:च्याच मोबाईलमध्ये करु न कोणत्याही रु गणालयात वा लॅबमध्ये न जाता केवळ ई-मेलद्वारे वॉईस किल्नीकला पाठविल्यास केवळ २० ते २५ मिनीटात सदर व्यक्तीच्या आवाजाच्या काही पॅरामीटर्सच्या बदलातून सदर व्यक्तींच्या श्वसन संस्थेवर काही परिणाम झाला आहे का? कळू शकते व वेळेत उपचार होवू शकतात, त्यानुसार या पध्दतीचा अवलंब ठाण्यातही करण्यात यावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.                     ठाण्यातील प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. आशिष भूमकर (भूमकर इनटी हॉस्पीटल) वॉईस थेरिपस्ट व स्पीच लॅग्वेज पॅथॉलॉलिस्ट सोनाली लोहार (वॉईस किल्नीक, ठाणे) व न्यूरोस्पीच लॅग्वेज थेरिपस्ट डॅनिअल जोनास (हेल्थ को हिअरिंग स्पीच अ‍ॅण्ड फिलीओक्लोनिक) यांच्या माध्यमातून ठाणे हेल्थ केअर या रु ग्णालयात आवाज व श्वसन पध्दतीचा अवलंब करु न कोरोनाची तपासणी करण्याचे संशोधन सुरू केले आहे. अशाच प्रकारचा संशोधन प्रकल्प मुंबई महानगरपालिकेत देखील प्रस्तावित आहे, ज्याद्वारे १ हजार व्यक्तींची तपासणी करणे शक्य होणार आहे. अत्यंत कमी वेळामध्ये ही तपासणी होत असल्यामुळे जास्तीत जास्त संशयित कोरोनाबाधीत व्यक्ती शोधून लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रु ग्णालयातून घरी गेल्यावरही कोरोनाचा फुप्फूसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असल्यास या तपासणीच्या माध्यमातून त्याचे लवकरात लवकर निदान करणे शक्य होईल व त्यावर लवकर उपचार मिळू शकतील.आवाजातील बदलाच्या अनुषंगाने करोनाचे लवकरात लवकर निदान होणेबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत डॉ. भूमकर व सोनाली लोहार यांचेशी गेले दोन महिने सातत्याने चर्चा चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार त्या मॉडेलवर काम करणे सुरू होते, त्यानुसार डॉ. भूमकर व त्यांचे सहकारी यांनी वरील पध्दतीचा अवलंब करु न ठाण्यामध्ये सदरचा अभ्यासप्रकल्प सुरू करण्याची दर्शविली आहे, तसेच पत्र देखील त्यांनी मला दिले आहे. तरी संबंधितांशी योग्य ती चर्चा करु न पुढील कार्यवाही त्वरीत व्हावी जेणेकरु न कोरोनावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होवू शकतो. असेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकामहापौर